Rain Update : खरीप हंगामावरही निसर्गाची अवकृपा

बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही वर्षामध्ये पाऊस अनियमित पडतो. त्याचा प्रतिकूल परिणाम पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोकणातील भातशेतीवर झाला आहे.
Kharip Season

Kharip Season

sakal

Updated on

राजापूर - बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही वर्षामध्ये पाऊस अनियमित पडतो. त्याचा प्रतिकूल परिणाम पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कोकणातील भातशेतीवर झाला असून त्यातून भातशेती आतबट्ट्याची राहिली आहे. अल निनोचा प्रभावामुळे हे नवे संकट घोंगावू लागले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पाऊस होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. गेल्या दीड महिन्यात पाऊस अनियमित आहे. त्यामुळे फळबागायतीप्रमाणे कोकणातील यावर्षीच्या खरीप हंगामावर निसर्गाची वक्रदृष्टी राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com