

पाली : कर्जत-खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरे यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) पालीमध्ये शनिवारी (ता. 8) जाहीर निषेध करण्यात आला. तसेच महेंद्र थोरवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोड्यांचा हार घालून काळे झेंडे दाखवत घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.