esakal | कोकणी शेतकऱ्यांनी फायद्यासाठी `हे` करावे....
sakal

बोलून बातमी शोधा

Need Of Konkan Single Brand Creation For Marketing Indu Sawant Comment

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एकात्मिक शेती व्यवस्थापन व महिलांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रात डॉ. सावंत बोलत होत्या.

कोकणी शेतकऱ्यांनी फायद्यासाठी `हे` करावे....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ ( रत्नागिरी) - शेतीमध्ये आज बरेचजण संघटितरितीने काम न करता एक एकट्याने काम करत आहे. त्यामुळे शेतीतून उत्पादित केलेला माल तसेच शेतीपूरक व्यवसायातून तयार केलेल्या उत्पादनांना बाजारामध्ये योग्य भाव मिळणे शक्‍य होत नाही. यासाठी कोकणातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध उत्पादनांचा कोकणासाठी एकच ब्रॅंड तयार करून बाजारात आणावा. जेणेकरून त्याचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या माजी संचालिका डॉ. इंदू सावंत यांनी केले. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित एकात्मिक शेती व्यवस्थापन व महिलांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रात डॉ. सावंत बोलत होत्या. महिला दिनानिमित्त सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या महिला रूपाली गंगाराम मोरे, लक्ष्मी वसंत गायकवाड, कविता अशोक चांदोरकर, दीप्ती सावंत, श्रीमती फातिमा अब्बास मोहिमतुले, प्रियांका कर्देकर, मालती जाधव, डॉ. मगर यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी सेंद्रिय शेतीमधील महिलांच्या सहभागाचे महत्व सांगितले. या वेळी शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, कृषी विद्या विभागप्रमुख डॉ. प्रशांत बोडके आदी उपस्थित होते. यानंतर महिला व पुरुष शेतकऱ्यांनी कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर आयोजित कृषी प्रदर्शनाला भेट दिली. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक व शिवार फेरीचे आयोजन केले होते. 

loading image