रत्नागिरीत १२० नवे कोरोना रूग्ण ; मृतांचा आकडा दोनशेच्याजवळ 

राजेश कळंबटे 
Thursday, 17 September 2020

आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या चोविस तासात 120 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 417 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये आणखी 6 जणांची भर पडली असून हे रुग्ण गेल्या चार दिवसांमधील आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 193 झाला आहे. दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढत असून मृत्यू दर 3 टक्केवर पोचला आहे.

जिल्ह्यात मागील चार दिवसात कोरोना बधितांचा आकडा कमी होता. गुरुवारी (ता. 17) पुन्हा त्यात वाढ झाली आहे. आजच्या अहवालानुसार आरटीपीसीआर 63, अ‍ॅन्टीजेनमध्ये 57 रुग्ण आहेत. दापोली तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही. मंडणगड 6, खेड 16, गुहागर 10, चिपळूण 32, संगमेश्वर 16, रत्नागिरी 29, लांजा 6, राजापूर 5 असे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे रुग्ण 12 सप्टेंबरपासूनचे आहेत. गुरुवारी मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चिपळूण, रत्नागिरी आणि संगमेश्‍वरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उर्वरित तिघांमध्ये रत्नागिरीतील 87 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू 16 सप्टेंबरला, चिपळूणातील 80 वर्षाच्या रुग्णाचा 14 सप्टेंबरला तर दापोलीतील 52 वर्षाच्या व्यक्तीचा 12 सप्टेंबरला मृत्यू झाला होता. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 193 वर पोचली आहे. अडीच टक्केपर्यंत आलेला मृत्यूदर गेल्या आठ दिवसात पुन्हा वाढू लागला आहे. नवीन रुग्णांची भर पडत असतानाच गुरुवारी 139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात घरडातील 15, खेड लवेलमधील 10, चिपळुणातील 24, रत्नागिरी सामाजिक न्याय भवन येथील 28 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनातून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 4,171 झाली असून हा दर 64.90 टक्के आहे. सध्या जिल्ह्यातील विविध केंद्रांमध्ये 1,150 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
 

रत्नागिरी तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 29 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यापैकी सात पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या पावस परिसरातील आहेत. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्रत्येक सार्वजनिक क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरातील बाजारपेठे, महावितरण कार्यालय, पालिका कर्मचारी यांची चाचणी केली. शिवाजीनगर परिसरातील एका बँकेच्या झोनल ऑफिसमधील कर्मचार्‍यांचीही चाचणी झाली. त्यात 3 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले. याशिवाय रत्नागिरी तालुक्यात सापडलेल्या 27 नव्या रुग्णांमध्ये पावस परिसरातील सात बाधित एकाच कुटुंबातील आहेत. याशिवाय जे के फाईल्स येथे 1, 1 पोलीस कर्मचारी, खडपे वठार 1, मारुती मंदिर 1, वाटद खंडाळा 2, संगमेश्वर 1, गावडेआंबेरे 1, नाचणे 2, कर्ला 1, चिपळूण 1, कुवारबाव 1, गयाळवाडी 2, पठाणवाडी 1, अभ्युदय नगर 1, पेठकिल्ला 1, जेलरोड 1 आणि जुवे येथील एक रुग्ण आहे.

हे पण वाचा -  ह्रदयद्रावक ; २४ तासात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू ; गावाने फोडला हंबरडा 

  एकूण तपासणी         37, 759
एकूण पॉझिटिव्ह          6,417
एकूण मृत्यू                 193
 होम आयसोलेशन            523
एकूण बरे झालेले           4,171
 उपचार घेत असलेले       1,150

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 120 corona patients in ratnagiri