रत्नागिरी आणखी वीस जणांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

नवीन रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील अधिक रुग्ण असून त्यात कोविड योद्ध्यांचा समावेश आहे. 

रत्नागिरी - बुधवारी दिवसभरात प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालातून वीस कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2012 वर पोचली असून 22 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. 

नवीन रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील अधिक रुग्ण असून त्यात कोविड योद्ध्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्याने सापडलेल्यांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 17 तर अ‍ॅन्टीजेन टेस्टमधील 3 रुग्णांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचे 17 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्याने आलेल्या 17 अहवालात रत्नागिरीतील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील थिबा पॅलेस परिसरात आणखी तीन रुग्ण सापडले. 

रत्नागिरी तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. गौरी गणपतीसाठी चाकरमानी दाखल झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये नाचणे येथील एक डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय थिबा पॅलेस परिसरात पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत. तसेच आठवडा बाजार 1, नाचणे आयटीआय क्वारंटाईन 2, प्रतिभा वसतिगृह 1, कारवांचीवाडी 2, सैतवडे 1, टीआरपी 2, आंबेडकरवाडी 1, आंबेशेत 1, आरोग्य मंदिर 1 आणि गोळप येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधित रुग्णसंख्या वाढत असली तरीही तुलनेत बरे होणार्‍यांचे प्रमाणही अधिक आहे. आज सोडण्यात आलेल्या 22 रुग्णांमध्ये चिपळूण माटे हॉलमधील 1, समाजकल्याण मधील 6, घरडा 12 आणि कामथे, चिपळूण येथील 3 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1357 झाली आहे. अजुनही 396 प्रस्ताव प्रलंबित आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 20 corona positive patient in ratnagiri