ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी ४३ जणांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 July 2020

जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार 379 झाली आहे. 

रत्नागिरी :- बुधवारी उशिरा प्राप्त अहवालांमध्ये 43 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार 379 झाली आहे. 

 नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कामथे येथील  19, रत्नागिरी तालुक्यातील 19, दापोली  2 आणि घरडा येथील 3 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.  राजापूर येथील एका 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. 

रत्नागिरी येथे 17 जुलैला अँटीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या 68 वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. यामुळे बुधवारी दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 46 झाली आहे.

हे पण वाचा - कोकणातील ग्रामपंचायतीचे चाकरमान्यांसाठी  नियम : मुंबईकर चाकरमान्यांपर्यंत धाडले निरोप... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 43 corona positive case in ratnagiri

Tags
टॉपिकस
Topic Tags: