रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी; रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

राजेश शेळके 
Tuesday, 3 November 2020

दापोली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत तर मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर तालुक्यांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही.

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये फक्त 9 कोरोना रुग्ण सापडले आहेत तर 71 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात 33 जणांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचा दर 94 टक्केच्या दिशेने जाताना दिसत आहे. मोठा दिलासा देणारी ही बाब आहे. मात्र गेल्या चार दिवसानंतर आज कोरोनाने एकाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूदर देखील 3.73 वर गेला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव चांगलाच ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून 15 च्या आत कोरोना रुग्ण सापडत आहेत. जनजागृती आणि कोरोना भीतीचा मोठा परिणाम झाल्यामुळे नागरिक स्वतःहून खबरदारी बाळगत आहेत. जिल्ह्यात नवीन 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 476 झाली आहे. यामध्ये आरटीपीसीआर 2 तर अ‍ॅण्टिजेन चाचणीत 7 बाधित आढळले आहेत. दापोली 5, गुहागर 1, रत्नागिरी 2, लांजा 1 रुग्ण सापडले आहेत. 

दापोली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत तर मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर तालुक्यांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. 33 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 7 हजार 947 जण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 93.75 टक्केवर गेले आहे. 71 जणांचा आजचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून एकूण 49 हजार 60 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
 जिल्ह्यात गेले चार दिवस एकाचाही कोरोनाने मृत्यू झाला नव्हता; मात्र आज चिपळूण येथील एका 69 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 317 झाली असून मृत्यूदर 3.73 टक्क्यावर पोहचला आहे तर जिल्ह्यातील 17 केंद्रांवर 111 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. 

हे पण वाचा कोकणातील अकराही आमदारांना घरी बसविणार ; नारायण राणे

 एकूण बाधित रुग्ण        8,476

* एकूण निगेटिव्ह रुग्ण    49,060
* बरे झालेले रुग्ण           7,947
* एकूण मृत्यू                   317
* उपचाराखालील रुग्ण        111

.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new eight corona case in ratnagiri