बळीराजाचा `हा` नवा प्रयोग...चर्चा तर होणारच!

New experiment for rice farming konkan sindhudurg
New experiment for rice farming konkan sindhudurg
Updated on

कणकवली - कोकणात भातशेती करताना भाजणी, नांगरणी, चिखल, लावणी आदी कामे करावी लागतात. त्यासाठी मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात लागते. भात उत्पादन खर्च देखील वाढतो; मात्र या सर्वाला फाटा देत मल्चिंग पेपरचा वापर करून भात शेतीचा प्रयोग ओरोस गावराईतील शेतकरी संतोष सामंत यांनी केला आहे. 

या भात शेतीला कमीत कमी खतांची मात्रा, दुप्पट ते चौपट उत्पन्न आणि महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची धूप देखील थांबवली जाते. एकदा मल्चिंग पेपर अंथरला की त्यामध्ये भातपिकासह अन्य चार पिकेही घेता येतात. मशागतीचाही खर्च वाचत असल्याने ही भात शेती निव्वळ पोटापाण्यापुरतीच न ठरता भरघोस उत्पन्न देणारी देखील ठरू शकते असा विश्‍वास प्रगतशील शेतकरी सामंत यांनी व्यक्‍त केला आहे. 

श्री.सामंत यांनी आजपर्यंत कलिंगड, टरबूज आदी पिके मल्चिंग पेपरद्वारे घेतली. त्यानंतर त्यांनी मल्चिंग पेपरवर भात शेती देखील सुरू केली आहे. गावराईतील दोन एकर क्षेत्रात त्यांनी "वाडा कोळंब' या भात पिकाची लागवड केली आहे. पारंपरिक पद्धतीने भात शेती करताना भात रोपे उपटून ती पुन्हा लागवड केली जातात. भात पेरल्यानंतर त्या शेतात तण-गवत देखील उगवते. त्यामुळे गेली अनेक वर्षे चिखल करून पुन्हा भात रोपे लावली जातात; मात्र यात भाताची मूळे दुखावतात. मल्चिंग पेपरवरील भात लागवडीमध्ये असा प्रकार होत नाही. पाऊस कमी झाला तरी सुलभ पद्धतीने भात शेतीला पाणी देता येते. 

मल्चिंग पेपरवरील भात लागवडीत महत्वाची बाब म्हणजे जास्त मणुष्यबळाची गरज नाही. मशागतीची मूळीच गरज नाही. भात रोपांचा फुटवा मोठ्या प्रमाणात येतो. कीटकनाशकांचाही फारसा खर्च नाही. भाताची मूळे दुखावत नसल्याने पिक जोमदार राहते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही पारंपरिक भात शेतीला फाटा देत, नव्या तंत्राने भात लागवड करायला हवी. तरच भातशेतीमधून भरघोस तथा व्यावसायिक उत्पादन घेता येईल असेही आवाहन संतोष सावंत यांनी केले आहे. 

अशी होते लागवड 
उन्हाळ्यात भातशेतीची मशागत करून गादीवाफे तयार करून घेतले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरला. या पेपरवर एक फुट बाय एक फुटावर दोन इंच होल पाडून त्यात 4 ते 5 भातदाणे टाकले. तर दोन फुटांमध्ये अर्धाफुटावर होल पाडून त्यात युरिया ब्रिकेटच्या गोळ्या टाकल्या. त्यामुळे कमी मजूरांत आणि कमी पाण्यात भात लागवड झाली, अशी माहिती श्री.सामंत यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot
Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com