esakal | कोकणात २० वर्षात वाढणार जंगल ; जपानी 'मियावाकी फॉरेस्टचा' अविष्कार
sakal

बोलून बातमी शोधा

the new technology of japan miyawaki forest launched in konkan

जपान मधील वनस्पतीतज्ञ डॉ. अकिरा भियावाकी यांचे धनपद्धतीचा वृक्ष लागवडीचे मियावाकी फॉरेस्ट हे तंत्र आहे.

कोकणात २० वर्षात वाढणार जंगल ; जपानी 'मियावाकी फॉरेस्टचा' अविष्कार

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : ग्लोबल चिपळूण टूरीझम संस्थेतर्फे जपानमधील 'मियावाकी  फॉरेस्ट' हे तंत्र वापरून धामणवणे येथील डोंगरात वृक्ष लागवड केली जाणार आहे. जपान मधील वनस्पतीतज्ञ डॉ. अकिरा भियावाकी यांचे धनपद्धतीचा वृक्ष लागवडीचे मियावाकी फॉरेस्ट हे तंत्र आहे. संस्थेचे अध्यक्ष रामशेठ रेडीज यांच्या धामणवणे येथील डोंगरातही वृक्ष लागवड केली जाणार आहे. 2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता नाम फौंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचे हस्ते या उपक्रमाची सुरवात होणार आहे.

हेही वाचा - तारिख पें तारिख अजून किती वर्षे वाट पाहायची ? 

याबाबत माहिती देताना श्री. रेडीज म्हणाले, पश्चिम घाटातील वनसंपदेचा गेल्या काही वर्षात होत असलेला र्‍हास ही अतिशय चिंतेची बाब आहे. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी जंगलाचे अस्तित्व महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे जागतिक स्तरावरील तज्ञांनी वेळोवेळी अधोरेखित केले आहे. या भूमिकेतूनच ग्लोबल चिपळूण टूरिझमने दोन एकर क्षेत्रावर घन पद्धतीच्या वृक्ष लागवडीतून नैसर्गिक जंगले निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.  

जपानमधील अकिरा भियावाकी या 13 वर्षे वयाचा वनस्पती शास्त्रज्ञाने जपान मध्ये पहिल्यांदा अशी वृक्ष लागवड करून स्वतःचे एक नवीन तंत्र विकसित केले. ज्याला आता जगभर मियावाकी तंत्रज्ञान म्हणून मान्यता मिळाली आहे. या तंत्राचे वैशिष्ट म्हणजे जे जंगल पूर्णत: वाढण्यासाठी आणि जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध होण्यासाठी 200 वर्षाचा कालावधी लागतो त्या जंगलाची फक्त 20 वर्षात पूर्ण वाढ होते. या तंत्राने आता पर्यत 40 दशलक्ष वृक्षांची लागवड करण्यात आली असून कोकणात अशा पद्धतीने होणारी ही पहिलीच लागवड ठरणार आहे. 

धामणवणे येथे अस्तित्वात असलेल्या छोट्या पक्षी अभयारण्याचा बाजूला हे मोठे घनदाट जंगल होणार असल्याने या ठिकाणी मोठे पक्षी अभयारण्य तयार होणार आहे. या घनदाट  जंगलाचा वापर हा जनप्रबोधन आणि पर्यटनासाठी करण्याचा संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पावर संस्थेने मेहनतीसह लाखो रुपये खर्च केले आहेत. धामणवणे येथे होत असलेल्या या प्रकल्याची पूर्व तयारी एक वर्षापासून सुरु आहे.

हेही वाचा - मासेमारीच्या नौका मिरकवाड्यातच उभ्या ; काय आहे कारण ?

2 एकर प्रत्येकी 4 फुटावर, अडीज फुट लांबी - रुंदी व खोलीचे खड्डे तयार करून त्यामध्ये विविध प्रकारची सेंद्रिय खते, भाताचे तूस, मोकी पिट, गांडूळ खत इत्यादींचा वापर करून हे खड्डे भरून लागवडीसाठी तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पा मध्ये 1 वर्षे वयाच्या 95 स्थानिक वृक्ष प्रजातीची लागवड करण्यात येणार आहे. एक वर्षापासून या रोपांची जोपासना सुरू आहे. आमदार शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

संपादन - स्नेहल कदम