सकाळ न्यूज इफेक्ट : अखेर व्यंक्या लंबोरेला मिळाली मदत ते झाले भावुक....

प्रमोद हर्डीकर
Thursday, 9 July 2020

पशुसंवर्धनसाठी जीवन घालवलेल्या व्यंक्या लंबोरे ह्यांच्या उतार वयात आलेल्या अडचणीच्या काळात यानी केली मदत...

साडवली (रत्नागिरी) : काही दिवसा पूर्वी साखरपा जवळील पुऱ्ये गावातील धनगर वाडीतील व्यंक्या लंबोरे ह्याचा पशू संवर्धनाचा जीवनपट आणि  त्यांची आत्ता खालावलेली परिस्थिती यावर दै.सकाळने प्रकाशझोत टाकला होता.

ही बातमी मनसे च्या पदाधिकाऱ्यांना समजताच तालुका संपर्क अध्यक्ष मनविसे दिनेश मांडवकर आणि सहसंपर्क अध्यक्ष मनोहर गोताड यांनी  पुढाकार घेऊन मनसे तालुका अध्यक्ष,नगरसेवक अनुराग कोचिरकर यांच्या उपस्थितीत व्यंक्या लंबोर ह्यांचे डोंगर माथ्यावर असलेल्या घरी जावून मदत देण्यात आली.मनसेने मायेने त्यांच्या बरोबर केलेली विचारपूस आणि मदतीच्या हाताने  लंबोर खूप भावुक झाले .

हेही वाचा- कोकणात या बँकांना मिळाली शासकीय बँकिंग व्यवहार करायला परवानगी.... -

लंबोर झाले भावुक
त्यांचे घर म्हणजेच त्यात त्यांनी अजूनही दोन गायीची जोपासना याही वयात केलेली आहे आणि त्यांच्या जीवनातील त्याच त्यांच्या सोबती आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय धोकादायक झालेली असून त्यांना शासकीय मदत मिळण्यास मनसे पाठपुरावा करेल असे  कोचिरकर यांनी सांगितले.तसेच त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे २-३ महिने पुरेल अशी मदत त्यांना सुपूर्द केली. व्यंक्या लंबोर यांच्यासारखी व्यक्तिमत्वे खरंच खूप विलक्षण असतात. त्यांना आपण जपलेच पाहिजे सध्या त्यांना मदतीची गरज असून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी मदतीचा हात पुढे  करावा असे आवाहन मनसे साखरपा पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे. 

हेही वाचा-पावसाच्या कोसळधारेने बळीराजा चिखळणीत ; गप्पा व लावणीची रंगत लागली रंगू.... -

ह्या वेळी मनसे तालुका अध्यक्ष, नगरसेवक अनुराग कोचिरकर, मनविसे सह संपर्क अध्यक्ष मनोहर गोताड, मनविसे तालुका अध्यक्ष सिद्धेश वेल्हाळ, देवरुख शहर अध्यक्ष ऋतुराज देवरुखकर, प्रीतम गोताड ,उपस्थित होते

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News Effect Venka Lambore help from MNS in sadvli ratnagiri