"आगामी काळात राजापूरचा आमदार भाजपचाच"..... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आतापासूनच संघटनात्मक बांधणीला सुरवात केलीय.

राजापूर (रत्नागिरी) : गेल्या काही वर्षापासून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद वाढत चालली आहे. त्याला विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी तथा माजी आमदार प्रमोद जठार यांची भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये प्रदेश सचिवपदी निवड झाल्याने त्यांच्या ताकदीची त्याला जोड मिळणार आहे. आगामी काळात राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची निश्‍चितच ताकद वाढणार असून राजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार भाजपचाच असणार, असा विश्‍वास भाजपचे नेते संतोष गांगण यांनी व्यक्त केला. 

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आतापासूनच संघटनात्मक बांधणीला सुरवात केलीय. त्यातून नुकतीच प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला. त्यामध्ये काही जुन्या आणि नव्या नेत्यांना महत्त्वाची पदे देऊन योगदान देण्याची जबाबदारी दिली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी तथा माजी आमदार जठार यांची प्रदेश सचिवपदी निवड झाली. जठार यांचे गांगण यांनी अभिनंदन केले. यावर ते म्हणाले, ""माजी आमदार जठार यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. संघटना कशा पद्धतीने बांधावी, याचा चांगलाच अनुभव गाठीशी असल्याने त्याचा फायदा होऊन राजापूर विधानसभा मतदारसंघात आगामी काळात भाजप निश्‍चित मजबूत स्थितीमध्ये येईल.

हेही वाचा- सकाळ न्यूज इफेक्ट : अखेर व्यंक्या लंबोरेला मिळाली मदत ते झाले भावुक.... -

भाजप नेते गांगण; प्रमोद जठारांचा अनुभव, बळ महत्त्वाचे ​

तालुक्‍याचा विचार करता या ठिकाणी तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या नेतृत्वाखाली भाजप अधिक मजबूत होताना त्याला जठार यांच्या अनुभवाची जोड मिळेल. विद्यमान लोकप्रतिनिधींची प्रशासनावर पकड नसून त्यातून ढिसाळ प्रशासकीय कारभार आहे. माजी आमदार जठार यांनी आपल्या मतदार संघामध्ये अनेक विकासकामे केली. विकासकामांबाबत त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा राजापूरच्या विकासासाठी निश्‍चितच होईल, असा विश्‍वास गांगण यांनी व्यक्त केला.'' 

हेही वाचा- रत्नागिरीत काही निर्बंधांसह लॉकडाऊन होणार शिथिल : जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन​ - ​

रिफायनरी समर्थक असलेले जठार.. 
जठार हे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचे कट्टर समर्थक आहेत. कोरोनामध्ये अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अशा स्थितीमध्ये रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे रिफायनरी समर्थक असलेले जठार यांची भूमिकाही महत्वाची ठरणार असल्याचे मत गांगण यांनी व्यक्त केले आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: next year Rajapur MLA is from BJP leader Santosh Gangan expressed confidence