esakal | नीलेश राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलाय भेदभाव...
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Rane Comment On CM Uddhav Thackeray

"निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. 3 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेगवान वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्‍याला मोठा फटका बसला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील अनेक गावे या चक्रीवादळामुळे बाधित झाली आहेत.

नीलेश राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलाय भेदभाव...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - "निसर्ग' चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याला 100 कोटी घोषित करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांनी हा भेदभाव केल्याची टीका भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे बघायला वेळ नाही त्या मुख्यमंत्र्यांना किती डोक्‍यावर घेणार? असा टोलाही त्यांनी हाणला. 

"निसर्ग' चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. 3 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेगवान वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्‍याला मोठा फटका बसला आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील अनेक गावे या चक्रीवादळामुळे बाधित झाली आहेत.

या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्‍यातील हजारो नागरिक बेघर झाले असून अनेकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. हे नुकसान कोटींच्या घरातले आहे. ही परिस्थिती असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ रायगड जिल्ह्याला भेट दिली. केवळ एका जिल्ह्यासाठी शंभर कोटींची मदत घोषित केली आहे. ज्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने शिवसेनेवर विश्वास दाखवून हातात सत्ता दिली त्याची दखल मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतलीच नाही.

या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर माजी खासदार नीलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. रायगड जिल्ह्यासाठी शंभर कोटी नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. पण रायगडमध्ये एक, दोन ठिकाणी पाहणी करून ते परत मुंबईत आले. सिंधुदुर्ग व रत्नागिरीतसुद्धा अनेक गावे आहेत. जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ती पाहणी करायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे. 

रत्नागिरीचे पालकमंत्री दिसतही नाहीत 
चक्रीवादळात नुकसान झालेल्या पुण्यातील पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याची नीलेश राणे यांनी स्तुती केली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग पालकमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दिसत नाहीत. रत्नागिरीत तर त्याहून परिस्थिती गंभीर आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री दिसतही नाहीत. 
 

loading image