मुख्यमंत्र्यांकडून मुलाच्या हट्टासाठी ४५ कोटी अन्... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

"मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी आणि राम मंदिरासाठी फक्त 1 कोटी रूपये. याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही," असा प्रश्न राणे यांनी मुख्यंमत्री ठाकरे यांना विचारला आहे. 

सिंधुदुर्ग : राम मंदिरासाठी एक कोटी रूपये देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर कडक शब्दात ताशेरे वडले आहेत. "मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी आणि राम मंदिरासाठी फक्त 1 कोटी रूपये. याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही," असा प्रश्न राणे यांनी मुख्यंमत्री ठाकरे यांना विचारला आहे. 

हे पण वाचा - Womens Day - video विवाहानंतर सात वर्षांनंतर पायांत चढवले घुंगरू आणि मिळविली पदवी

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आयोध्येला गेल्यानंतर तेथे पत्रकारपरिषद घेवून राम मंदिरासाठी एक कोटी रूपये देणगी देण्याची घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा करताना ते म्हणाले होते की, राम मंदिराच्या बांधकामासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत आहे. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार आहे. परंतु, त्यांच्या याच घोषणेवरून निलेश राणे यांनी ही टीका केली आहे. 

 

 

हे पण वाचा -  सावधान ; कॉफी शॉपमध्ये जाताय... होईल ही कारवाई

दरम्यान, शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापण केल्यापासून राणे कुटुंबीयांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. याधीही मुंबईमधील जीजामाता उद्यानात मुंबई महापालिकेने पेंग्विन आणले होते. त्यासाठी 45 कोटींचा खर्च आला होता. त्यावरून वादही झाले होते. त्याच विषयाचा संदर्भ घेऊन निलेश राणे यांनी ही टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane criticism on cm uddhav thackeray