'माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackray

'माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले'

sakal_logo
By
अर्चना बनगे

रत्नागिरी: उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं. फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.असा सणसणीत टोला भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आज (शुक्रवार) tweet करुन मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. (nilesh-rane-criticism-on-CM- Uddhav-Thackeray-Leader-Tauktae-cyclone-kokan-visit-marathi-news)

तौक्ते वादळामुळे (Tauktae cyclone) नुकसान झालेल्या भागाचा दौरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस (Leader of Opposition Devendra Fadnis) हे करत आहेत. देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई -पास काढला आहे का? अशी विचारणा माहितीच्या अधिकारात झाल्याने यास राणे यांनी काल प्रत्यूत्तर दिले होते.

हेही वाचा- विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे कोकणवासीयांना आश्वासन

आज पुन्हा त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाना साधला आहे. ते म्हणाले माध्यमांना देखील खरं वाटत नाही की उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, सतत उद्धव ठाकरे कुठे पोहोचले याचा पाठलाग सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं.आपद्ग्रस्तांची प्रत्यक्ष भेट नाहीच आणि भरपाईची घोषणाही नाही.मुख्यमंत्री रत्नागिरीत आले, 10 मिनिटे थांबले आणि गेले सुद्धा फडणवीस साहेब कोकण दौऱ्यावर आले म्हणून झक मारत मुख्यमंत्र्यांना यावं लागलं, ही औपचारिकता आहे, दुसरं काही नाही.

loading image
go to top