'त्या' बंद खोलीत काय चर्चा झाली?

 'त्या' बंद खोलीत काय चर्चा झाली?

मालवण (सिंधुदुर्ग) : कोकणाने शिवसेनेला (Shivsena) भरभरून मते दिली. मात्र शिवसेनेने कोकणाला (Kokan) काय दिले. आठ दिवस उलटले तरी वादळग्रस्तांना मदत जाहीर होत नाही. वैभव नाईकांना (Vaibhav Naik)प्रशासनात काडीची किंमत नाही, अधिकारी भीक घालत नाही. आठ, आठ दिवस वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित आहेत. शिवसेनेकडून जनतेला अपेक्षा नाहीत त्यामुळे जी मदत शक्य आहे ती नुकसानग्रस्तांपर्यंत पोचवण्याचे काम भाजप करत आहे. मदतीचे सेवाकार्य यापुढेही सुरूच राहील. भाजप म्हणून आम्ही जनतेसोबत आहोत असा विश्वास भाजप नेते प्रदेश सचिव नीलेश राणे (Nilesh Rane)यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.(nilesh-rane-criticism-on-Devendra-Fadnavis-and-uday-samant-visit-on-konkan-marathi-news)

तोक्ते चक्री वादळानंतर नुकसान झालेल्या मालवण, देवबाग, वायरी व अन्य परिसराची आज भाजप नेते नीलेश राणे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना पत्रे, ताडपत्री व जीवनावश्यक वस्तू आदी मदतीचे थेट वाटप केले. कौलांची गाडीही सायंकाळ पर्यत येईल. नुकसान ग्रस्तांना कौलांचेही वितरण केले जाईल. असेही राणे यांनी स्पष्ट करत ग्रामस्थांना दिलासा दिला. आम्ही आपद्ग्रस्तांसोबत आहोत असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. वादळ झाल्याच्या दिवसापासून भाजपचे मदतकार्य सुरू आहे. जनतेला थेट मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. केंद्र शासनाकडूनही मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे राणे यांनी सांगितले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, जॅक्सन फर्नांडिस, अवी सामंत यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक ठिकाणी वीजपुरवठा आठ दिवस लोटले तरी अद्याप सुरू झालेला नाही. ज्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला त्याचे श्रेय स्थानिक जनतेलाच जाते. त्यांनी मदत केली म्हणून वीजपुरवठा सुरळीत झाला. तुटलेली झाडे जनतेने तोडत बाजूला केली. त्यामुळे सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. प्रशासनावर अंकुश नसल्याने मालवण अजूनही अंधारात आहे. मात्र आम्ही सतत प्रशासनाच्या संपर्कात आहोत. वीज साहित्याची कमतरता होती. ती दूर केली. बाहेरून आलेले कर्मचारी परत जात होते. जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांना थांबवले. भाजप जनतेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

वादळ म्हणजे आमदारांचा सिझन...

वादळ, भूकंप झाला की आमदार वैभव नाईक याचा सिझन चालू होतो. त्यांचा पत्र्याचा धंदा आहे. लाज वाटली पाहिजे शिवसेनेच्या आमदाराला. या आपत्ती काळात पत्रे विकणे सुरू आहे. ज्यावेळी जनतेला मदत पाहिजे तेव्हा हे व यांचे मंत्री नुसती आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री येऊनही जनतेला मदत जाहीर होत नाही ही शोकांतिका आहे अशी टीका नीलेश राणे यांनी केली. मुख्यमंत्री यांच्याशी बोललेल्या क्लिप व्हायरल करायच्या व आपली पाठ थोपटून घ्यायची कामे आमदार नाईक करत असून जनतेशी त्यांचे देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर एसडीआरएफचा निधी आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'त्या' बंद खोलीत काय चर्चा झाली ?

सिंधुदुर्ग वादळाच्या सावटाखाली असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गला वाऱ्यावर सोडले. भाजप नेते राज्याचे विरोधी पक्षनेते रत्नागिरी दौऱ्यावर असताना उदय सामंत त्यांना येऊन गुपचुप भेटतात. बंद दाराआड चर्चा होते. उदय सामंत यांचे सगळे विषय टेंडरचे असतात असा घणाघाती आरोप नीलेश राणे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com