"मंत्रालय ची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कस ची पाटी लावा''

nilesh rane criticize on cm uddhav thackeray sindhudurg political marathi news
nilesh rane criticize on cm uddhav thackeray sindhudurg political marathi news
Updated on: 

 सिंधुदुर्ग :  कशाचाच कोणाला पत्ता नाही, कोणाचा कोणावर अंकुश नाही असं हे ठाकरे सरकार. मुख्यमंत्र्याना मेसेज टाकून अधिकारी सुट्टीवर जायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्याची काय किंमत आहे हे यावरून दिसते. मंत्रालय ची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कस ची पाटी लावा.असा टोला खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून राज्य सरकार वर जोरदार टिका केली.

सचिन वाझे या प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. या बदलामुळे पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी नाराज झालेत. यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख संजय पांडे यांचा समावेश आहे.

परम परमवीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन चा कारभार देण्यात आला आहे.  मात्र हे दोघे अधिकारी पदभार न स्वीकारता मोठ्या सुट्टीवर गेले आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर आज निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर  ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

संपादन- अर्चना बनगे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pali Ramdas Athawale Constitution Statement RPI To Connect All Communities With Its Social Justice And Equality Agenda
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com