esakal | अजून किती कामगारांचा बळी घेणार? निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल

बोलून बातमी शोधा

अजून किती कामगारांचा बळी घेणार? निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल
अजून किती कामगारांचा बळी घेणार? निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : खेड लोटे एमआयडीसीमध्ये तालुक्‍यात चार महिन्यांच्या कालावधीत आगीच्या सहा घटना घडल्या. त्यात कामगारांचाही बळी गेला असून अजूनही सरकारची मदत पोहोचलेली नाही. फायर ऑडिट करणार, असे सांगून वेळ मारून नेण्यात येते. ठाकरे कसलीच अंमलबजावणी करत नाही. आता आगीचा आरोपही केंद्र सरकारवर टाका, असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केला.

स्फोटाचे प्रकार होऊनसुद्धा शिवसेनेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे एमआयडीसीत होणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष केले आहे. सरकार झोपी गेले आहे. काही कंपन्यांमध्ये जुनी साधनसामुग्री आहे. त्या आधारे ते उत्पन्न घेत आहेत. त्यामुळे कामगारांना कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री पुरवली जात नाही. काही दिवसांपूर्वीच सेनेचे आमदार उदय सामंत यांनी कंपन्यांचे स्ट्रक्‍चर ऑडिट करण्याचे सांगितले होते. अद्यापही ऑडिट केले गेलेले नाही. ऑडिटचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. आग लागूनही प्रशासन आणि सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या गोंधळात लोटे एमआयडीसीत होणाऱ्या स्फोटाच्या घटना दडपल्या जात आहेत, अशी चर्चा लोटे परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा: International Dance Day : नसानसांत भिनलेल्या नृत्यामधून चैतन्यदायी ऊर्जा!

सेनेचे लोकप्रतिनिधी करतात काय

लोटे एमआयडीसीत २५० हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्यांना क्‍लोजरच्या नोटीस दिल्या होत्या. त्या कंपन्या बंद करण्याचा आदेश असतानाही तेथील स्थानिक शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करतात काय?

अजून किती कामगारांचा बळी घेणार?

कंपनी व्यवस्थापक, प्रशासन, सेनेचे लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळेच त्या आगीत निष्पाप कामगारांचा बळी जात आहे. कामगारांचा बळी जाऊनदेखील ठाकरे सरकारने मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. कंपनी व्यवस्थापक अजून किती कामगारांचा बळी घेणार? तिथले आमदार आग लागली की, फक्त फोटोबाजी करण्यासाठी पुढे-पुढे येतात आणि फायर ऑडिट करू, असे सांगून निघून जातात, असेही राणे यांनी आपल्या ट्‌विटद्वारे नमूद केले.