एका नोटीसला इतके घाबरले, मग संजय राऊतांना म्हणत बसावं लागेल ' मै नंगा हू'.

Nilesh Rane criticizes MP Sanjay Raut on Twitter
Nilesh Rane criticizes MP Sanjay Raut on Twitter

सिंधुदुर्ग :  शिवसेना खासदार संजय राऊत सामनामधून भाजपवर नेहमी प्रमाणे टिका केली आहे. मात्र, त्यावरुन नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीच्या नोटीसवरून आक्षेपार्ह टीका केली आहे. राणे म्हणाले, एका नोटीसला इतके घाबरले, मग संजय राऊतांना म्हणत बसावं लागेल ' मै नंगा हू'."

निलेश राण यांचं ट्विट
राणे टिका करताना म्हणाले की, संजय राऊत यांच्यासारखे लोक मर्दानगीची भाषा करतात, हे खूप हास्यास्पद वाटते.ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढले ते मैदानात लढाईची भाषा करतात. मैदानात आल्यानंतर त्यांना कळेल की लढाई म्हणजे काय असतं. लढाई सुरू झाल्यानंतर तुमची अवस्था पाहून म्हणावं लागेल, ' मै नंगा हू'." संजय राऊत ईडीच्या एकाच नोटसला खूप घाबरले असल्याची टिका केली आहे.  

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटिस बजावली. पत्नीला आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला आहे. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नसल्याचा इशारा राऊतांनी  यावेळी दिला. तसेच त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप ही तेवढ्याच आक्रमकतेने त्यांना उत्तर देताना दिसत आहे. 


संजय राऊत काय म्हणाले ?
नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ, असंही त्यांनी सांगितलं. ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं म्हणत देशात आजही कायदा असून त्याचा सन्मान केला पाहिजे. देशात सध्या इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान संजय राऊत यांनी एक ट्विटही केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, तुम लाख कोशिश करलो मुझे बदनाम करने की मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा


राजकारणाचा ताप वाढेल
निलेश राणे यांनी टीका करताना अनेकवेळा राजकिय नेत्यांबाबत अरे-तुरे या भाषेचा प्रयोग करताना पहायला मिळेल यात काही नवल नाही, मात्र, यामुळे राज्यातील राजकाराणात आणखीची ताप वाढण्याचे संकेत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com