खरे आकडे लपावणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केंद्राकडे मागितली हजारो कोटींची मदत : निलेश राणे यांनी समोर आणली वस्तुस्थिती 

राजेश कळंबटे
Wednesday, 22 July 2020

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या हजार ते बाराशे कोटींच्या नुकसान झाल्याच्या वक्तव्याला पुष्टी मिळाली आहे.

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची वस्तुस्थिती आणि खरे आकडे लपवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता केंद्र सरकारकडे 1 हजार 65 कोटींची मदत आहे. याचाच अर्थ 25 जून रोजी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या हजार ते बाराशे कोटींच्या नुकसान झाल्याच्या वक्तव्याला पुष्टी मिळाली आहे. मात्र या आपत्तीला दोन महिने उलटले तरी जिल्हा प्रशासनाने मात्र केलेल्या पंचनाम्याचे खरे आकडे उघड केलेच नसून अनेक गावांमध्ये किती मदत मिळाली ही वस्तुस्थिती सुद्धा उघड झालेली नाही. 

निसर्ग चक्रीवादळमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्याला मोठा तडाखा बसला. चक्रीवादळची पूर्व सूचना मिळाल्याने जिल्हा प्रशासनाने या भागातील रहिवाश्यांना वादळाच्या काळात सुरक्षित स्थळी हलवल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दोन तालुक्यांना वादळाच्या बसलेल्या तडाख्याने अनेकांच्या आयुष्यभराची कमाई संपली आहे. याभागात केवळ घरे, गोठे यांचेच नव्हे तर शेती बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही बागायती अनेक पिढ्यानी जोपासलेली आणि त्यावर उदरनिर्वाह चालणारी होती. त्यामुळे निसर्गाच नुकसान हे काही हजार कोटींच्या घरातले आहे हे उघड होते.

हेही वाचा- शिवसैनिकांनो, काॅरंटाईन व्हा! असे का म्हणाले कणकवलीचे नगराध्यक्ष? -

25 जून रोजी रत्नागिरीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते निलेश राणे यांनीही हीच वस्तुस्थिती दापोली मंडणगड च्या दौऱ्यानंतर स्पष्ट केली होती. पंचनामे करणे आणि तत्काळ मदत पोहोचवणे आवश्यक असताना ते पूर्ण होण्याऐवजी प्रशासनाचा बहुतांश वेळ हा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये गेला होता. त्यामुळे महिन्यानंतरही प्रशासनाचे पंचनामे पूर्ण होऊ शकले नव्हतेच परंतु जे नुकसान झाले होते ते उघड करण्यास प्रशासनावर सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून दबाव टाकण्यात आला.

एवढा मोठा तडाखा बसूनही दापोली आणि मंडणगड तालुक्याच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभी न राहू शकल्याने ही वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न या लोकप्रतिनिधींकडून केला गेला. किती प्रत्यक्ष नुकसान झाले, किती मदत आली याची संपूर्ण माहिती अद्यापही जनतेला उघड झालीच नाही.

हेही वाचा- शिक्षकांच्या बदल्या निश्चित, सिंधुदुर्गातील संख्या अशी... -

मात्र राज्य शासनानेच केंद्र सरकारकडून 1 हजार 65 कोटींची मदत मागितल्याने पत्र उघड झाल्यानंतर राज्याची हतबलता आणि निसर्ग ची वस्तुस्थिती पुढे आली असून निलेश राणे यांनी  केलेल्या नुकसानीच्या आकड्याला पुष्टी मिळाली आहे. त्यातच ही मदत राज्य सरकारने केंद्राकडे मागण्यासाठी दोन महिने लावल्याने या अपत्तीबाबत आणि इथल्या लोकांच्या अडचणींबाबत राज्य शासन आणि इथले लोकप्रतिनिधी किती संवेदनशील आहेत हेही उघड झाले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane press conference in ratnagiri 1,065 crore assistance to the government