'मातोश्रीचं' नाव बदलून 'लॉकडाउन' करा; मुख्यमंत्र्यांवर निलेश राणेंचा घणाघात

nilesh rane ritiseid on CM thakre on the topic of corona in press conference of ratnagiri
nilesh rane ritiseid on CM thakre on the topic of corona in press conference of ratnagiri
Updated on

रत्नागिरी : मुख्यमंत्री राज्याला भीकेला लावणार, या मुख्यमंत्र्याला लॉकडाऊनशिवाय काहीच दिसत नाही. त्यांचा पहिला, मधला आणि शेवटचा उपाय हा लॉकडाऊनच आहे. ते लॉकडाऊनशिवाय काहीच बोलत नाही. त्यामुळे आता 'मातोश्रीचं' नाव बदलून 'लॉकडाऊन' करा अशी टीका भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. आता राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभुमीवर सर्वपक्षीय नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवादही साधला होता. लॉकडाऊनच्या निर्णयासंदर्भात निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यत्रंणेचा उडालेला बोजावारा सप्रमाण दाखवून दिला आहे. यासंदर्भात येत्या काही दिवसात जनहित याचिकाही दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

ते म्हणाले, कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत आहे. मुख्यमंत्र्यांना काही कळतं की नाही हे मला समजत नाही. राज्यातील नागरिक भुकेने मरतील. त्यांच्या एसओपी कोण तयार करतं हेच कळत नाही. कोरोनाच्या नावावर अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात देखील गंभीर परिस्थिती आहे. मंत्री उदय सामंत यांनी दोन हजारपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. पण ते बेड्स प्रत्यक्षात आहेत कुठे? जिल्ह्याला कोणीही वाली नाही. पालकमंत्री येत नाहीत, ते वसुलीत व्यस्त आहेत.

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सामान्य लोकांची यात काय चूक आहे. त्यांनी या सार्‍या स्थितीत काय करावं. मेडिकल स्टाफ उपलब्ध नाही. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. या वेळेला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचा दावा कसा काय करू शकता असा प्रश्‍न निलेश यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात रेमडेसिव्हीअरचा साठा नाही. या स्थितीत जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा सुट्टीवर आहेत.

भास्कर जाधव आले त्यांच्यात काहीतरी बिनसले. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी सुट्टीवर गेले. या सार्‍याकडे कुणाचं कसं लक्ष नाही. याबाबत कोण जाब विचारणार आहे की नाही. लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार यांना कुणी दिला. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सुरु असलेला खेळ हा एक संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आहे. सत्ताधारी, अधिकारी या सार्‍यांना मोक्का लावला पाहिजे. कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात होत असलेल्या हलगर्जीपणाबाबत लवकरच एक जनहित याचीका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com