खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजुला हो ; निलेश राणेंनी कोणाला दिले आव्हान

शिवप्रसाद देसाई
Wednesday, 2 September 2020

सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका केली होती.

सिंधुदुर्ग  : खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि हो बाजुला अशा शब्दांत खालच्या पातळीवरील टिका माजी खासदार निलेश राणे यांनी आज ट्विटरवरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली. 

सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका केली होती. माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून तर आदित्य ठाकरेंवर सतत टिका सुरू आहे. आजही त्यांनी  पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी  ट्वीट करून आदित्य  ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.

हेही वाचा- Good News : कोकणकर यंदा भातलागवडीत झाली वाढ, वाचा -

शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रीपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही... खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो.असे ट्विट त्यांनी केले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane tweet for Environment Minister Aaditya Thackeray