esakal | नीलेश राणे यांनी भाजपला दिली 'ही' ग्वाही 
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Rane VIsit Ratnagiri BJP Office News

सोमवारी नीलेश राणे यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

नीलेश राणे यांनी भाजपला दिली 'ही' ग्वाही 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - रत्नागिरीत भारतीय जनता पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी एकत्रितरित्या काम करूया, येणारा भविष्यकाळ इथली जनता आणि पक्षाच्यादृष्टीने उज्ज्वल करूया, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात केले. तसेच पक्षाला जिथे गरज असेल, तिथे मी उभा राहणार, अशी ग्वाहीही राणे यांनी यावेळी दिली.

सोमवारी नीलेश राणे यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

समुद्र किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी  हे तंत्र 

जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले की, रत्नागिरी भाजपला कणखर नेतृत्वाची गरज आहे ती पूर्ण झाली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेश राणे आहेत. आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी तुम्ही आम्हाला हवे आहात. जसे तात्यासाहेब नातू, कुसुमताई अभ्यंकर, शिवाजीराव गोताड, बाळ माने, विनय नातू यांच्यासह सुरेश प्रभू, बापूसाहेब परुळेकर अशी मान्यवर व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदार होत्या, त्याचबरोबरीने आपणही खासदार होता. पुढील काळात पुन्हा रत्नागिरी जिल्हा भाजपमय करण्यासाठी आपण सर्व एकत्र काम करू या. नीलेश राणे यांच्याशी अनेकदा बोलणे झाले, पण सुरुवातीला अगदी औपचारिक आणि देशाच्या अर्थ विषयाशी, जडणघडणीविषयी चर्चा करत होतो. आता राजकीय चर्चा होते. 

रस्ताकामाचे ठेके घेणारेच करतात आंदोलन; राष्ट्रवादीचा आरोप 

माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजेश सावंत आदी उपस्थित होते. 

दरम्यान, भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात येणार अशी आशा आता मावळताना दिसत आहे. या दोघातील वाद आता स्पष्ट होताना दिसत आहे. अशातच नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेमुळेही ते चर्चेत आले आहेत. राणे यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांना चाणक्य म्हणणे म्हणजे चायनीजच्या गाडीवरच्या पोराला ब्रूस लि म्हणल्या सारखेच आहे. अशी टीका केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्विटरवरून सादर करत हा व्हिडिओ राऊत यांच्या तोंडावर फेकून मारा असे म्हटले आहे.  त्यामुळेही सध्या ते चर्चेत आहेत.