esakal | सावधान ! `या` गावातील एकाच घरात सापडले नऊ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Nine Corona Positive In Only One House In Kondetad Ratnagiri Marathi News

दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 92 होती. स्वातंत्र्यदिनी त्यामध्ये एकाने वाढ होवून ती 93 झाली. कुवेशी येथे नव्याने एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता.

सावधान ! `या` गावातील एकाच घरात सापडले नऊ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

राजापूर ( रत्नागिरी) - शहरानजीकच्या कोंढेतड येथील एकाच दिवसामध्ये एकाच घरातील तब्बल नऊ रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांची शंभरी पार झाली असून ती आता 102 झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या तालुकावासियांची चिंता वाढविणारी आहे. 

दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 92 होती. स्वातंत्र्यदिनी त्यामध्ये एकाने वाढ होवून ती 93 झाली. कुवेशी येथे नव्याने एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर बारा तासाच्या कालावधीमध्ये तब्बल नऊ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. हे कोंढेतड येथील एकाच कुटुंबातील असून पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोंढेतड येथील एकाच घरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11 झाली आहे. या रुग्णांचे रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यात आले होते. 

दृष्टिक्षेपात राजापूर 

एकूण कोरोना पॉझिटिव्ह- 102 
बरे झालेले रुग्ण- 66 
एकूण मृत्यू- 7 
सद्यस्थितीत कार्यरत रुग्ण- 29 
कंटेन्मेंट झोन- 11 
 

 
 

loading image