वर्षानुवर्षे वर्षे ग्रामपंचायतीवर अधिराज्य गाजवणाऱ्यांना घरचा रस्ता ; चिपळूणात ९ गावांत सत्तापालट

in nine village domination change by many years in chiplun ratnagiri
in nine village domination change by many years in chiplun ratnagiri

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यात सर्वार्धिक चुरशीच्या ठरलेल्या खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीत जंयद्रथ खताते गटाने बाजी मारत एकहाती सत्ता राखली. मात्र, तालुक्‍यात किमान ९ गावांत सत्तांतर झाले. वर्षानुवर्षे वर्षे ग्रामपंचायतीवर अधिराज्य बाळगणाऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. रामपुरात माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांना विरोधकांनी धूळ चारली. सावर्डेत माजी सभापती समीक्षा बागवे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही विजय मिळवला.

अलोरे येथे सर्व ११ जागा जिंकून जिल्हा परिषदेचे माजी सभापती विनोद झगडे यांच्या गटाने विरोधकांचे पानिपत केले आहे. तालुक्‍यातील हा निकाल वैशिष्ट्यपूर्ण ठरला. शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात आज ता. १८ रोजी ६१ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. तालुक्‍यातील दसपटी विभागात कोंडफणसवणे येथे सत्तांतर झाले आहे. पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्या कोंडफणसवणेतील समर्थक गटास ५ तर विरोधकांना केवळ दोन जागा मिळाल्या. अलोरेत माजी आरोग्य व बांधकाम सभापती विनोद झगडे यांच्या गटाने विरोधकांचे पानिपत केले आहे.

सर्व ११ जागा जिंकून त्यांनी विरोधकांना नामोहरम केले आहे. ओवळी येथेही सत्तांतर झाले असून माजी सरपंच दिनेश शिंदे यांच्या गटाला ७ पैकी ५ जागा मिळाल्या. कादवड येथे सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायतमधील सत्ता राखली. येथे पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला. मिरजोळी येथेही सत्तांतर झाले आहे. माजी सरपंच कासम दलवाई यांच्या गटास ९ पैकी ७ जागा मिळाल्या. काही महिन्यापूर्वी मिरजोळी ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवल्याने येथे विशेष लक्ष लागले होते. 

तुरबंव येथे तर आमदार भास्कर जाधव यांच्या भावकीतच काटे की टक्कर होती. यावर्षी आमदारांच्या गटाने बाजी मारीत तुंरबंव ग्रामपंचायतीवर एकहाती विजय मिळवला आहे. कोळकेवाडीत राणे गटाला धक्का, पेढांबेत सेनेची बाजी कोळकेवाडी येथे वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीवर वरचष्मा असलेल्या रमेश राणे यांच्या गटाला धक्का बसला आहे. शिवसेना व बसपा प्रणित असलेल्या पॅनेलने ६ जागा जिंकून विजय मिळवला. राणे गटास केवळ ५ जागा मिळाल्याने त्यांची सत्ता गेली. पेढांबे शिवसेना प्रणित गटाचाच वरचष्मा राहिला आहे. ११ पैकी १० जागा जिंकून सेनेने विजयी पताका फडकवली. 

..येथे झाले सत्तांतर

निवळी, नायशी, कोंडमळा, तुरंबव
ओवळी आणि मिरजोळी येथेही झाले सत्तांतर

कुशिवडेत सेनाप्रणित पॅनेलचाच विजय

तालुक्‍यातील कुशिवडे येथे माजी सरपंच सिद्धार्थ कदम यांना पाडण्यासाठी सर्वजण एकवटले होते. सलग १९ वर्षे ते ग्रामपंचायतीत आहेत. शिवसेनाप्रणित गाव विकास पॅनेलमध्ये काही पदाधिकारी फुटून राष्ट्रवादीला मिळाले. जातीपातीचे राजकारणही झाले. तरीही सेनाप्रणित गाव विकास पॅनेलने ९ पैकी ८ जागा जिंकून मतदारांचा विश्‍वास संपादन केल्याचे दाखवून दिले.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com