Big breaking - निसर्ग चक्रीवादळाने उडविली रत्नागिरी किनारपट्टीवर दाणादाण 

nisarga cyclone live update impact on ratnagiri district
nisarga cyclone live update impact on ratnagiri district

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी किनारपट्टीची दाणादाण उडवली आहे. ताशी 80  किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. समुद्र खवळला असून एक जहाज भरकटले आहे. 

हवामान विभागाच्या निरदर्शानुसार पहाटेपासून रत्नागिरी जिल्हयात निसर्ग  वादळाचा परिणाम जाणवू लागला. रात्री हलका वारा आणि पाऊस सुरु होता. मात्र पहाटे पाच वाजल्यापासून वादळाने रौद्ररूप धारण केले. बुधवारी सकाळी त्यात भर पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. 

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेगवान वाऱ्यामुळे झाडे पिळवटून टाकली आहेत. संगमेश्वर,  रत्नागिरीत अनेक ठिकाणी झाडे घरावर पडून नुकसान झाले आहे. महावितरणने अनुचित प्रकार टाळण्यासाठी रात्रीच वीजपुरवठा खंडित केला. 

जिल्हा प्रशासन सतर्क असून दापोली,  गुहागर,  मंडणगड तालुक्यातील किनारी भागाकडे सर्वाधिक लक्ष लागले आहे. एनडीआरएफची दोन्ही पथके सुरक्षेसाठी तैनात केली आहेत. या तीन तालुक्यातील सुमारे चार हजर लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. चक्रीवादळामुळे  रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव मार्गावरील बानखिंड येथे झाड कोसळल्याने शिरगावच्या दिशेने जाणारा रस्ता बंद झाला आहे, फक्त दुचाकी वाहने जाण्यासाठी जागा आहे. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम चिपळूण परिसरातही जाणवत आहे. मध्य रात्रीपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. खाडी पट्ट्यातील भागात जोरदार वारे वाहत आहेत. 

नाणीज जवळील नवीन मठाजवळ  निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष आज सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला. अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नाणीज येथील तलाठी मिस्त्री  त्वरीत घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पडलेल्या वृक्ष बाजूला करण्यात आला. वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

निसर्ग वादळाचा धसका घेऊन रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या 2 जहाजांनी काल  सायंकाळ नंतर आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला असून जहाजाचा नांगर तुटला आहे. नांगर तुटल्याने तो जहाज भरकटत जात असल्याचे चित्र मिरकरवाडा, भगवती बंदरात पहायला मिळत आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com