मुंबईकरांनो सावधान... निसर्ग चक्रीवादळ येतय!

nisarga cyclone live update nisarga cyclone move from sindhudurg to mumbai
nisarga cyclone live update nisarga cyclone move from sindhudurg to mumbai

सावंतवाडी - निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पुढे गेले असले तरी ते आज दुपारी 1 ते सायंकाळी 4 च्या दरम्यान अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. त्याचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर असल्याने वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उंच लाटा असे याचे स्वरूप असेल अशी माहिती हवामान खात्यातील वरिष्ठ सुत्रांनी दिली. त्याचा प्रभाव रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या चारही जिल्ह्यांवर दिसण्याची शक्यता आहे. 

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


निसर्ग चक्रीवादळ कालपासून कोकण किनारपट्टीच्या समांतर अरबी समुद्रातून प्रवास करत आहे. हे वादळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांपासून पुढे सरकले. किनारपट्टी आणि वादळ यातील अंतर जास्त असल्याने या दोन्ही जिल्ह्यात तुलनेत कमी नुकसान झाले. तरीही वादळी वारे, जोरदार पाऊस असे परिणाम दिसले. आता हे वादळ किनारपट्टीच्या जवळ सरकत आहे. दुपारी 12.30 च्या दरम्यान ते दिवे आगरच्या पुढे गेले होतेे. 
हे वादळ अलिबागच्या दक्षिण भागातून जाण्याची शक्यता आहे. तेथून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला याचा प्रभाव दिसेल. तेथून पुढे ते पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबारपर्यंत याचा प्रभाव दिसू शकतो. यात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यात आज रात्रीपासून उद्यापर्यंत हा प्रभाव दिसू शकतो.

नंदूरबारपर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झालेला असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अलिबागला धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी कमी होत जाईल. उद्या दुपारपर्यंत याची तीव्रता संपुष्टात येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com