
ओरोस : मॉन्सूनपूर्व पावसाने काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणत्या सुधारणा करायच्या आहेत, याचा अंदाज आला आहे. महावितरण आणि बीएसएनएलच्या समस्या उघड झाल्या आहेत. महावितरणच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री तथा वीजमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष पॅकेज आणणार आहे. पुढील वर्षी मे संपेपर्यंत वाट न पाहता पावसाळापूर्व नियोजन एप्रिलमध्येच करण्याचे आदेश सर्व विभागांना दिल्याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी शनिवारी येथे दिली.