
'खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवला तर विकास होणार नाही'
खासदार राऊत विकासकामांच्या नावे खोटी पत्र देतात, राणेंचा हल्लाबोल
कणकवली : विधानसभा निवडणुकीवेळी खासदार विनायक राऊत यांनी साकेडी येथील विकासकामांसाठी निधी देण्याची ग्वाही दिली होती. तसे पत्रही येथील ग्रामस्थांना दिले होते; मात्र तीन वर्षांत विकासकाम झाले नाही. त्यामुळे खासदार राऊत हे विकासकामांच्या नावे खोटी पत्र देत आहेत, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला. तालुक्यातील साकेडी मुस्लीमवाडी येथील दर्गा सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार राणे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा: "महागाई फायद्याचीच"; शेतकऱ्यांची बाजू घेत सदाभाऊ खोतांचं समर्थन
...तर जनता विश्वास ठेवणार नाही
राणे म्हणाले, खोटी पत्रे देऊन जनतेला कसं फसवलं जातं त्याचं हे उदाहरण म्हणजे हे काम होत. खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवला तर विकास होणार नाही. केवळ निवडणुकीपुरती काही नेते मंडळी आश्वासने देत आहेत. मात्र धार्मिक स्थळाबाबत अशी आश्वासने देणाऱ्यांवर जनता मूळीच विश्वास ठेवणार नाही.
या कार्यक्रमावेळी साकेडी सरपंच रीना राणे, उपसरपंच जहूर शेख, माजी सभापती संजय शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, माजी सरपंच बंडू साटम, सईद काझी, हुंबरट उपसरपंच मुस्ताक काझी, दर्गा समिती अध्यक्ष फारुख काझी, कासम शेख, माजी उपसरपंच पांडुरंग वर्दम, संतोष राणे, अकबर शेख, इस्माईल शेख, रहेमान शेख, अब्बास शेख, बाबूलाल शेख, तिवरे उपसरपंच भाई आंबेलकर, ठेकेदार पवन भालेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साकेडी मुस्लीमवाडी दर्गा सभामंडपा करिता १० लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांचा दर्गा समितीच्या वतीने व साकेडी हुंबरट मुस्लीमवाडी ग्रामस्थांच्यावतीने हृदय सत्कार करण्यात आला.
हेही वाचा: देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Web Title: Nitesh Rane Criticizes To Vinayak Raut On Fake Documents Of Development Work In Konkan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..