"राजकीय प्रवासातील अनेक वळणे, अडचणी आल्या तरी देवगडवासीयांनी सांभाळून घेतले. आता घरातील हक्काचा आमदार मंत्री झाल्यामुळे पुढील पाच वर्षे निश्चिंत रहा."
देवगड : आपल्यामध्ये आणि देवगडवासीयांमध्ये (Devgad) फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे घरी बसले आणि मी मात्र मंत्री झालो, असे प्रतिपादन राज्याचे नवनिर्वाचित मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी जामसंडे येथे व्यक्त केला. येथील बंदर विकास तसेच विजयदुर्ग बंदर विकासाकडे लक्ष राहील, असेही ते म्हणाले.