उद्धवजी पण गारद का... ?...आपल्याच मालकाला??!! नितेश राणेंचा सवाल....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची ट्विटवरून त्यांनी अशी खिल्ली उडवली..... 

रत्नागिरी :  संजय राऊत म्हणतात  एक शरद ..सगळे गारद.. उद्धवजी पण  का? आपल्या मालकाला!! वा क्या बात!!! असे म्हणत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेले ट्विट आता चर्चेचे ठरले आहे. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची ट्विटवरून त्यांनी अशी खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1280801058848157696

हेही वाचा- तीन महिन्यांत या 500 ग्रामपंचायतीची मुदत संपणार ; अधिकारी की.... जनतेतून संभ्रम? -

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 11 ते 13 जुलै रोजी प्रसारित होणार आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो श्री राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून प्रसारित केला आहे. एक शरद सगळी गारद असे म्हणत त्यांनी या मुलाखतीचे प्रमोशन केले आहे.

 

हेही वाचा- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात घेतला मोठा निर्णय  ; मात्र रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आहे संभ्रमात का वाचा...? -

एक शरद सगळे गारद ​

 या ट्विटरवरुन श्री राणे यांनी उद्धवजी पण गारद का असे विचारत संजय राऊत यांचा चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत देशात खळबळ माजवणार असल्याचा दावा श्री राऊत यांनी केला आहे. श्री राऊत यांनी श्री पवार यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव असतानाच त्यांनी घेतलेली पवार यांची मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे. खुद्द राऊत यांनी या मुलाखतीची माहिती ट्विटरवरून दिली ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजविल असा दावा त्यांनी केला आहे. एक शरद सगळे गारद यावरून श्री राणे यांनी खिल्ली आहे. हे ट्विट आता महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चेचे ठरले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitesh rane tweet in social media such a mockery MP Sanjay Raut tweet