esakal | पूजा चव्हाण प्रकरणावरून 'दीवार' आठवला; नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

nitsh rane criticized on state government topic of pooja chavan in sindhudurg

याच पार्श्वभूमीवर काल आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटद्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

पूजा चव्हाण प्रकरणावरून 'दीवार' आठवला; नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या पुजा चव्हाण या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राज्यसरकारच्या काही नेत्यांची नावे या प्रकरणात पुढे येत असल्याने विरोधक त्याच्यावरुन टिकास्त्र सोडत आहेत. दरम्यान दोन दिवसांपुर्वी भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही सरकारवर टिका केली होती. चित्रा वाघ यांच्या पतीला एसीबीची नोटीस आल्याने दबाव टाकला जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. याच पार्श्वभूमीवर काल आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटद्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

राणे म्हणाले, 'शिवसेनेमध्ये पूजा चव्हाण प्रकरणावरून 'दीवार'चा डायलॉग आठवला. संजय राठोड आणि baby penguin आमने सामने... संजय राठोड : में पुराना शिवसैनिक हूँ.. मेरे पास बंगला, गाडी, मंत्रिपद सबकुच हैं.. तो भी लग गयी.. तेरे पास क्या है ?? Baby penguin : मेरा बाप CM है इसलिए मुझे सब माफ है !' असा टोला त्यांनी लगावला आहे. 

हेही वाचा - प्रसिद्ध कुणकेश्‍वर यात्रा अखेर रद्द -

दरम्यान या प्रकरणी राज्यातील महिला आघाडींनी कंबर कसून मंत्री संजय राठोड यांना शिक्षा होण्यासाठी आंदोलने, मोर्चे काढले आहेत. तसेच त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणीही केली आहे.   

loading image