साहित्यातून मनोरंजन करण्याचे दिवस गेले

अमोल नागराळे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

कारदगा : "साहित्यातून मनोरंजन करण्याचे दिवस गेले आहेत. जीवनातील प्रश्‍नावर साहित्यनिर्मितीची गरज आहे. जीवनातील वास्तव, सामान्यांची व्यथा, वेदना साहित्यात आल्या पाहिजेत', असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले. कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळातर्फे आयोजित रविवारी (ता. 27) 21 व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले.

महाराष्ट्रातील संमेलनात नसणारी व्यापकता कारदगा संमेलनात पाहावयास मिळत असल्याचे सांगून डॉ. वाघ म्हणाले,"साहित्य संमेलन म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नव्हे. साहित्य हे जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारे असते. ग्रामीण संमेलनात ग्रामीण जीवनाचे प्रश्‍न, विचार पुढे आले पाहिजेत. माझे लेखन केवळ करमणुकीसाठी नाही. मी ग्रामीण लोकांसाठीच लिहितो. माणसाच्या भावना शब्दबद्ध करणे म्हणजेच साहित्य होय. वेदनेतून, करुणेतून, सहानुभूतीतून साहित्याची निर्मिती होते. कृषिप्रधान देशात पाण्याची गरज आहे; पण पाण्याअभावी देशातील 86 टक्के शेती कोरडवाहू पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी मोठे दुःख पडले आहे. शेतकऱ्यांच्या, सामान्यांच्या व राबणाऱ्यांच्या समस्यांचा उहापोह संमेलनात झाला पाहिजे. शेतकरी बियाणाद्वारे स्वप्ने पेरतो; पण पाऊस झाला नाही तर त्याचे स्वप्न विरते. एकीकडे नोकरदारांना लाखो रुपयांचा पगार व दुसरीकडे राबणारा शेतकरी उपेक्षित असे वास्तव चित्र आहे. हा देश सामान्यांचा म्हणून ओळखला जातो. पण गरीब व सामान्यांसाठी नियोजन आहे का? असे प्रश्‍न साहित्यातून विचारले पाहिजेत.'

संमेलनास खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, लक्ष्मण चिंगळे, दूधगंगा कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन अमित कोरे, विनयानंद महाराज, श्रेणिक पाटील, चंद्रकुमार नलगे, सुनीलकुमार लवटे यांच्यासह मान्यवर व साहित्यिक उपस्थित होते.

Web Title: no more entertainment in literature