गुड न्युज : रत्नागिरी जिल्हा झाला कोरोनामुक्त.... 

no one corona infected in rarnagiri district
no one corona infected in rarnagiri district

रत्नागिरी - संपुर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने जनता भयभित झाली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या शृंगारतळी (गुहागर) येथील बाधिताचा फेरतपासणी नमुना आज निगेटीव्ह आला. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे, असे उच्च तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

अल्पबचत सभागृहामध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.उदय सामंत म्हणाले, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्याची यंत्रणा चांगली राबली. जिल्ह्यात 19 संशयित होते, त्यांचेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 840 लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुणे, मुंबई येथून तब्बल 58 हजार लोक आल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र त्यांच्यापासून काहीच धोका नाही. बहुतेक लोक संचारबंदी लागू होण्यापूर्वी पंधरा दिवस ते महिनाभर आधी आलेले आहेत. आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी जिल्हा रुग्णालय कोरोना सेंटर म्हणून जाहीर करण्याची तयारी देखील प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी 300 बेडस् तयार केले आहेत. हा भाग पूर्ण आयसोलेट केला जाईल, अशी तयारी आहे. मात्र आपल्यावर तशी वेळ येणार नाही. तसेच विदेशातून आलेल्या 858 पर्यटकांची नोंदही आपल्याकडे आहे. ते देखील निगराणीखाली आहेत. उद्यापासून संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली जाणार आहे. पोलिस आपल्या आरोग्याच्या काळजीपोटी हे सर्व करीत आहेत. हा सांघिक लढा असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडटवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब बेलदार आदी उपस्थित होते.
शहराबरोबर ग्रामीण भागातही होम डिलिव्हरी सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी सरपंचांशी संपर्क सुरू आहे. कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता सर्वांना बरोबर घेऊन ही सुविधा जनतेला दिली जाणार आहे. शिवभोजन थाळीचे उद्दीष्ट देखील तिप्पट वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे आणि सीमेवर लॉक केलेले तसेच कंपन्या बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्यांना त्याचा फायदा होईल. महिला बचतगटांना हे काम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाहेरून आलेल्या लोकासाठी सेंटर कॅम्प तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com