कोरोनाविरुद्ध रस्त्यावरची लढाई लढणारा पोलिस पगाराविना!

No police salary for the month of March
No police salary for the month of March
Updated on: 

रत्नागिरी : कोरोना विरोधात रस्त्यावरची लढाई लढणारे पोलिस आणखी एका संकटात आहेत. जवळपास एप्रिलचा निम्मा महिना संपत आला तरी पोलिस पगारविनाच आहेत. सरकारने मार्च महिन्याचा पगार दोन टप्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकारने पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र मार्च महिन्याचा पगार अद्याप पोलिसांच्या हातात पडला नाही. 

 पोलिसांच्या पगाराचा शासन निर्णयात उल्लेख नसल्याने पोलिसांच्या पगाराबाबत गोंधळाची परिस्थिती आहे.

जिल्ह्यात जवळपास  चाैदाशे पोलिस आहेत. परंतु, या पोलिस कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप न झाल्याने त्यांचे या महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. 10 तारीख उलटून चालली आहे. मात्र, पोलिसांच्या पगाराचे नाव नाही. मिळणारा पगारही पूर्ण मिळेल का?, याची शाश्वती नाही. 


दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक संकट देखील समोर उभे ठाकल्याने सरकारने पगार कपात करुन टप्प्याटप्प्याने देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी कोरोनाची दोन हात करण्यासाठी प्रत्यक्ष या लढाईत मैदानात उभे आहेत. त्यांचा पगार कपात करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र तरीही पोलिस कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. यामुळे अनेक पोलिस कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत.        

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
Marathi News Esakal
www.esakal.com