पाली - पेण तालुक्यातील दिव गावातील दिपिका म्हात्रे या गरिबी व अपंगत्वावर मात करत रायटर नाकारून स्वतः पेपर लिहून वयाच्या 37 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी तब्बल 69.20% गुण मिळवून यश मिळवले आहे.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या सेकंड चान्स प्रोग्राममधून शिक्षणाची संधी मिळवून आपली जीवन दिशा बदलणाऱ्या महिलांपैकी त्या एक आहेत.