esakal | Dabhol : विरोधकांना विकासकामांतूनच उत्तर आमदार कदम
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार योगेश कदम

दाभोळ : विरोधकांना विकासकामांतूनच उत्तर : आमदार योगेश कदम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : मी विरोधकांना आजपर्यंत कधीही शाब्दिक उत्तर दिले नसून मी विकासकामांच्या रूपानेच उत्तर देत आलो आहे. लोकांची दिशाभूल करून एखादे काम मीच केल्याचे श्रेय मी कधीही घेणार नाही. ते माझ्या तत्त्वात बसत नाही, असे आमदार योगेश कदम यांनी वेळवी येथे सांगितले.

वेळवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. केळशी गट भौगोलिकरीत्या अडचणीचा आहे. या जिल्हा परिषद गटात सर्वांधिक गावे आहेत. वेळवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे २०१३ च्या आराखड्यात मंजूर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींनी या कामाकडे दुर्लक्ष केले होते. घरात बसून कामे मंजूर होत नाहीत, तर त्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, असा टोला आमदार कदम यांनी लगावला.

हेही वाचा: शाळेच्या वेळेत एसटी फेऱ्या सुरू करा

या कामाचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण टपले आहेत. मात्र, मी पाठपुरावा केलेल्या या कामाचे श्रेय हे माझे नसून शिवसेनेचे असल्याचे कदम यांनी सांगितले. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असून आपल्याला विकासकामे करण्याची संधी चालून आली आहे. विरोधकांनी या विकासकामात राजकारण न करता विकासाला सहकार्य करीत दापोलीची शान वाढवावी, असे आवाहनही कदम यांनी केले.

दळवी आले असते तर आनंदच..

वेळवी येथे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या आभाराचे फलक पाहायला मिळाले. त्यावर बोलताना योगेश कदम यांनी २०१३ ला दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. मग आजपर्यंत या कामासाठी निधी उपलब्ध का झाला नव्हता, असा सवालही त्यांनी विचारला. या समारंभाला सूर्यकांत दळवी उपस्थित राहिले असते तर आम्हाला आनंदच झाला असता, असे योगेश कदम यांनी सांगितले.

loading image
go to top