
दापोली : दापोली किनारपट्टीवर उत्तरेकडील जोरदार वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. किमान ८० टक्के नौका नांगर टाकून उभ्या आहेत. त्यामुळे हर्णै बंदरात मासळीच नाही. त्यामुळे गेले महिनाभर मत्स्य दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये दुष्काळात तेरावाप्रमाणे मच्छीमारांची अवस्था झाली असून, हर्णै बंदराची आर्थिक घडीच विस्कटली आहे. याचा परिणाम येथील उद्योगविश्वावर झालेला दिसत आहे. रोज होणारी करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे.