राज्य सरकारने अंत्योदय कुटुंबांना सुरू केलेले साडी वाटप शिमगोत्सवापूर्वी म्हणजे १३ मार्चपूर्वी व्हावे, असे प्रयत्न पुरवठा विभागाने सुरू केले आहेत.
रत्नागिरी : कोकणात मोठ्या भक्तिभावाने साजरा केल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाच्या (Shigmotsav) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रास्त दराच्या धान्य दुकानातून साडीवाटपाचा (Saree) कार्यक्रम शासनाने सुरू केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३८ हजार १४२ अंत्योदय कुटुंबांना मोफत साडीचे वाटप होणार आहे. १३ मार्चपूर्वी हे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.