esakal | सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला
sakal

बोलून बातमी शोधा

०

जिल्ह्यात 132 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. 

सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची संख्येने हजारांचा टप्पा ओलांडला

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने 60 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या एक हजार 17 झाली. रविवारी (ता.23) रात्री मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील 82 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 16 झाली. सोमवारी आणखी 14 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. सक्रिय रुग्ण 459 आहेत. 

जिल्ह्यात सोमवारी दुपारी 12 वाजता संपलेल्या 24 तासात 210 अहवालातील 185 निगेटिव्ह तर 25 बाधित होते. या 25 मध्ये कणकवली - 8, सावंतवाडी 4, वेंगुर्ले 13, कुडाळ आणि वैभववाडी प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दुपारनंतर आणखी 35 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्यने हजारी पार केली. एकूण बाधित संख्या 1 हजार 17 झाली आहे. दुपारनंतर मिळालेल्या 35 रुग्णामध्ये एकट्या कणकवली तालुक्‍यात 22 रुग्ण आहेत. यामध्ये दोडामार्ग 1, कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण 3, कणकवली 1, कलमठ 12, कणकवली विद्यानगर 1, वरवडे 4, कणकवली नाडकर्णीनगर 1, देवगड जामसंडे 1, वैभववाडी करुळ 3, सावंतवाडी तळवडे 1, कुडाळ ओरोस 4, खरयेवाडी 1, रानबांबुळी 2, अशाप्रकारे समावेश आहे. 

नव्याने 92 स्वॅब आले आहेत. त्यामुळे नमुन्यांची संख्या 11 हजार 587 झाली. यातील 11 हजार 472 अहवाल आले. 115 अहवाल प्रतीक्षेत आहेत. नव्याने प्राप्त अहवालात आणखी 185 अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे निगेटिव्ह अहवालांची संख्या 10 हजार 510 झाली आहे. आतापर्यंत 523 व्यक्ती ठणठणीत होवून घरी परतल्या आहेत. 

संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 927 व्यक्ती कमी झाल्या. तेथे आता 19 हजार 107 जण आहेत. गाव पातळीवरील 932 व्यक्ती कमी झाल्या. त्यामुळे येथील संख्या 14 हजार 905 झाली. नागरी क्षेत्रातील पाचजण वाढल्याने तेथील संख्या चार हजार 202 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 650 व्यक्ती दाखल झाल्या. दोन मेपासून दोन लाख एक हजार 758 नागरिक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात 132 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. 

 मालवण तालुक्‍यातील तिसरा बळी 
मालवण : आंगणेवाडी येथील 86 वर्षीय वृद्धाचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना मधुमेहही होता. तालुक्‍यातील हा तिसरा बळी आहे. ते, 15 ऑगस्टला पॉझिटिव्ह आढळूले होते. तालुक्‍यात यापूर्वी तळगाव, देवली येथील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, तालुक्‍यात नव्याने सातजण बाधित आढळले आहेत. सातजण जिल्हा प्रशासनाने दिलेल्या 60 नव्या रूग्णांमध्ये समाविष्ठ नाहीत. मालवण शहरातील पाच, आचरा एक व देवली येथील एकाचा त्यात समावेश आहे. याला मालवण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिठारी यांनी दुजोरा दिला आहे. 

संपादन ः विजय वेदपाठक

loading image
go to top