कुठल्या जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अत्यल्प; पण क्वारंटाईनच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ.....वाचा

विनोद दळवी
Tuesday, 21 July 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता 33 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या 34 कोरोना रुग्ण सक्रिय राहिले असले तरी  क्‍वारंटाईन संख्या मंगळवारी 489 ने वाढली आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्यासाऱखी परिस्थिती आहे. जिल्ह्यात नव्याने 762 व्यक्ती दाखल झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 76 कोरोना तपासणी नमूने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या 4 हजार 744 झाली आहे. यातील चार हजार 668 नमून्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अजुन 76 अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील चार हजार 388 अहवाल निगेटिव्ह आहेत. 280 अहवाल बाधित आहेत. बाधितांपैकी 241 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. एकावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. पाच व्यक्तींचे  दुर्दैवी निधन झाले आहे. जिल्ह्यात आता 33 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 55 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 21 बाधित आणि 24 संशयित आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तीन  बाधित तर कोविड केअर सेंटरमध्ये सात कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील 3 हजार 898 व्यक्तिची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हे पण वाचा - त्या बैठकीला उपस्थित होते नाईक  : पालकमंत्री उदय सामंतसह वरिष्ठ  अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार

अशी झाली वाढ

जिल्ह्यातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये 285 व्यक्ती वाढल्याने येथे 15 हजार 106 व्यक्ती आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सहा व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 56 झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये 198 वाढल्याने येथील संख्या 11 हजार 969 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये 81 व्यक्ति वाढल्या असून येथील संख्या तीन हजार 81 झाली आहे. नव्याने 762 व्यक्ती दाखल झाल्याने दोन मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तिची संख्या एक लाख 42 हजार 549 झाली आहे.

हे पण वाचा - ...अन् विजयदुर्गबाबतच्या आशा पल्लवित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of quarantine in Sindhudurg district is increasing day by day