संगमेश्वरात 'या' कोरोना योद्धांचा स्वातंत्र्यदिनी गौरव

प्रमोद हर्डीकर
Saturday, 15 August 2020

कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला

साडवली : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन सोहळा देवरुख तहसील कार्यालय येथे थाटात पार पडला. तहसीलदार सुहास थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी देवरुख नगरपंचायतीचे सफाई कामगार शासनाने योग्य ती दखल घेतली. 

हेही वाचा - आजोबांच्या स्वप्नांसाठी नातीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा..

कार्यक्रमासाठी माजी राज्यमंञी रवींद्र माने, तहसीलदार सुहास थोरात, सभापती सुजित महाडीक, मुख्याधिकारी बालाजी लोंढे, प्रभारी नायब तहसीलदार अनिल गोसावी,प्रभारी महसुल नायब तहसीलदार के. जी. ठाकरे, निवडणुक नायब तहसीलदार एम. एम. आखाडे, गटविकास अधिकारी रेवंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरानावर मात करण्यासाठी अनेकांनी चांगले योगदान दिले आहे. त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा म्हणुन शासनातर्फे अशा कोरोना योद्धांना सन्मानपत्र देवुन  स्वातंत्र्यदिनाच्या विशेष कार्यक्रमात गौरविण्यात आले. आंबव प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे रवींद्र माने यांनी कोरोना सेंटर उभारणीसाठी सहकार्याबद्दल रवींद्र माने यांचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा - या गावात एकही विहीर नाही पण उन्हाळ्यातही वाहतात खळखळणाऱ्या पाण्याचे झरे...

आरोग्यविभाग, पोलीस यंत्रणा, राजु काकडे हेल्प अॅकॅडमी, देवरुख नगरपंचायत सफाई कर्मचारी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, तालुका बॅडमिंटन क्लब, पित्रे फाउंडेशन, आकार ऑर्गनायझेशन, देवरुख व संगमेश्वर व्यापारी संघटना, सत्यनारायण प्रासादिक बालमित्र समाज खालची आळी यांचा गौरव  करण्यात आला. संस्था-संघटना यांनी शासनाला सहकार्य केले आणि लॅाकडाउन काळात जनतेला अन्न मिळावे यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल तहसीलदार थोरात यांनी शासनातर्फे आभार मानले.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: occasion of independence day glorify the corona fighters in sangameshwar