
गुहागर : ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सॅटेलाईट टँगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले कासव (Olive Ridley Turtle) मादीने गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर १२० अंडी घातली होती. या अंड्यांपैकी १०७ कासवांच्या पिल्लांचा समुद्रीप्रवास सुरू झाला आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील कासवे स्थलांतर करतात, हे संशोधनाने सिद्ध केले आहे. त्याचा संदर्भ किनाऱ्यालगतचे तापमान, आर्द्रता आणि अन्नाची उपलब्धता आदी बाबींशी असू शकतो, असे मत कासवाच्या जीवनाचा अभ्यास करणाऱ्या निधी म्हात्रे यांनी म्हटले आहे. यावर्षी ओडिसामधील कासवाने तब्बल ३५०० कि.मी.चा प्रवास करत गुहागरचा समुद्रकिनारा गाठला.