esakal | आता ऑनलाईन शिक्षणातील गोंधळ होणार दुर ; कोकणातल्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

offline study for school students with the help of whatsapp group created by a teacher in ratnagiri

विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणामध्ये होणारा खोळंबा ऑफलाईन व्हिडीओमुळे काहीअंशी दूर होण्यास मदत झाली आहे.  

आता ऑनलाईन शिक्षणातील गोंधळ होणार दुर ; कोकणातल्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : राजापूर : पुरेशी मोबाईल रेंज आणि इंटरनेट अभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षण देण्याच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमावर आधारीत व्हिडीओ निर्मिती केली आहे. पस्तीस शिक्षकांनी  शंभरहून अधिक व्हिडीओ व्हॉटस ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणामध्ये होणारा खोळंबा ऑफलाईन व्हिडीओमुळे काहीअंशी दूर होण्यास मदत झाली आहे. 

हेही वाचा -  सव्वाआठ पैकी सव्वाच दिलात, आता आम्ही मुलांना बसवायचे तरी कुठे ?

पुरेशी मोबाईल रेंज आणि इंटरनेट अभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षण देण्याच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमावर आधारीत व्हिडीओ निर्मिती केली आहे. पस्तीस शिक्षकांनी  शंभरहून अधिक व्हिडीओ व्हॉटस ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणामध्ये होणारा खोळंबा ऑफलाईन व्हिडीओमुळे काहीअंशी दूर होण्यास मदत झाली आहे.  

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडीओ बनवून ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला जिल्ह्यातील पहिला उपक्रम आहे. त्यासाठी आवश्यक असलेले व्हिडीओ 35 तंत्रस्नेही शिक्षकामार्फत बनविले जात आहेत. हे काम सुरू असून आजपर्यंत शंभरहून अधिक व्हिडीओ बनविले आहेत. 

हेही वाचा - मच्छीमारांनो समुद्रात जाताय ? मग थोडं जपुनच, तुमच्यासाठी महत्वाची सूचना

सध्याच्या डिजीटल युगामध्ये अनेक गावांना मोबाईल नेटवर्क वा इंटरनेट सुविधा नाही. काही गावांमध्ये रेंज आहे मात्र, ती तुटकतुटक स्वरूपाची आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. त्यावर पर्याय म्हणून ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व्हिडीओ बनविण्यात आले आहेत. हे व्हिडीओ केंद्रप्रमुख आणि शिक्षकांच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येतील. त्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे व्हाटस्अप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. 

केंद्रप्रमुख आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षण विभागातील महेश हळदणकर, समीर तांबे, ज्ञानेश्‍वर गुरव, नितेश देवळेकर, हणमंत सोमवारे, तन्वीर खान, मुकेश मधाळे, भूपाली देसाई, शशिकला लोंढे, सुमती पेंडखलकर, रूबिना नावलेकर हे विषयतज्ञ म्हणून काम पाहतात. 

व्हिडीओ बनविणारे शिक्षक

भूमिका सावंत, संदीप परटवलकर, निशा मिरगुले, निशा देसाई, गणेश गोरे, सुभाष चोपडे, मनिषा बाकाळकर, सुनिल जाधव, ज्ञानेश्‍वर वाघाटे, गजानन नेवरेकर, नितीन पांचाळ, मैथिली लांजेकर, नंदकिशोर दिघोळे, ज्योतिर्लींग कोळी, स्मिता मयेकर, उदयकुमार नाईक, राजू कोरे, संदीप कंदुरकर , ज्योतिबा पाटील, रूपाली दोरूगडे , सुनिल पाटील , तुकाराम पाटील, राजीव ढेरे, अनिल मोहिते, पूर्वा दातार, दिनेश कुलपे , सुजित जाधव , प्रसाद पंगेरकर, राहुल गावित , रोहन आदमापुरे , लक्ष्मण घाडीगावकर, नरेंद्र मेजारी, सुग्रीव मुंडे, दर्शना मांडवकर, हिदायत भाटकर. 

संपादन - स्नेहल कदम