गणपतीपुळे समुद्रकिनारी तेलाचा चिवट थर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मार्च व एप्रिलमध्ये हा तेलमिश्रित थर लाटेमुळे किनारी येत असतो. मात्र हा काय प्रकार आहे. याची आम्हाला कल्पना नाही. क्रूड ऑईलचा प्रकार असावा, असे वाटते. तेल, प्लास्टिक व मृत मासे लाटेमुळे किनारी येतात. 

- सूरज पवार, गणपतीपुळे रहिवासी 

साडवली - गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर मंदिरासमोरील भागात लाटेबरोबरोबर तेलाचा चिकट थर किनाऱ्यावर येत आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मत देवरूख आठल्ये- सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. सरदार पाटील यांनी व्यक्त केले. 

गणपतीपुळे समुद्रकिनारी फिरत असताना एका भागात काळसर रंगांचे पाणी लाटेबरोबर येताना पाटील यांनी पाहिले. निरीक्षणाअंती हे तेलासारखे चिकट असल्याचे आढळून आले. तेल व वाळू यांचे ते चिकट मिश्रण लाटेबरोबर किनारी येऊन काही भाग काळपट पडल्याचे पाटील यांना आढळून आले. हे तेल बोटींचे की मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलरांचे हे समजायला काही मार्ग नाही.

समुद्रकिनारी कायम वावरणाऱ्या गणपतीपुळे येथील ग्रामस्थांच्या मते, असा प्रकार नेहमी मार्च, एप्रिलच्या दरम्यान पाहायला मिळतो. समुद्रकिनारी येणारा हा तेलाचा व प्लास्टिकमिश्रित थर नेमका कसला आहे याचा अभ्यास करायला हवा, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी अभ्यासासाठी या तेलमिश्रित वाळूचा नमुना घेतला आहे. 

मार्च व एप्रिलमध्ये हा तेलमिश्रित थर लाटेमुळे किनारी येत असतो. मात्र हा काय प्रकार आहे. याची आम्हाला कल्पना नाही. क्रूड ऑईलचा प्रकार असावा, असे वाटते. तेल, प्लास्टिक व मृत मासे लाटेमुळे किनारी येतात. 

- सूरज पवार, गणपतीपुळे रहिवासी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oil layer on Ganpatipule coastal area