मधमाश्यांच्या हल्ल्यात एका वृध्दाचा मृत्यु...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जामसंडे वेळवाडी येथे कलमांची मशागत करताना घडली.

देवगड - मधमाश्यांच्या हल्ल्यात एका वृध्दाचा मृत्यु झाला. नवलसिंह भट्टे टमाटा (वय ६४, रा. पाटथर आसरोंडी मुळ रा. नेपाळ) असे त्यांचे नाव आहे. यामध्ये धोंडू दौलत कदम (वय ६५, रा पाटथर, आसरोंडी) हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची तब्येत स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जामसंडे वेळवाडी येथे कलमांची मशागत करताना घडली. सोबतच्या कामगारांनी पळ काढल्यांनी ते बचावले. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An old man dies in a bee attack

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: