मुलाकडे जाते असे सांगून निघालेली जेष्ठ महिला बेपत्ता | Missing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाकडे जाते असे सांगून निघालेली जेष्ठ महिला बेपत्ता

मुलाकडे जाते असे सांगून निघालेली जेष्ठ महिला बेपत्ता

पाली - सुधागड तालुक्यातील पडसरे येथील लक्ष्मी वामन चोरघे (वय 62) या जेष्ठ महिला 15 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता खालापूरला वाजता मुलगा अनंता वामन चोरघे रा. ढेकु, ता. खालापुर याच्याकडे जाते असे शेजारी सांगून घरातून निघून गेल्या आहेत. त्या अद्यापही घरी परतलेल्या नाहीत. या महिलेला कोणी पाहिले असल्यास ताबडतोब पाली पोलिसांना कळवावे असे आवाहन रविवारी (ता.14) पाली पोलिसांनी केले आहे.

सदर महिलेची उंची 4.5 फूट, अंगाने मध्यम, गोरा रंग, गोल चेहरा, बसके नाक, गळ्यात काळ्या मण्याची माळ, निळ्या जांभळ्या रंगाचे साडी, पायात चप्पल घातली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सीमा चांदोरकर या करीत आहेत.

loading image
go to top