यंदा समुद्रकिनारे ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्याविनाच

olive ridley tortoise egg not found on sea beach in ratnagiri for this year
olive ridley tortoise egg not found on sea beach in ratnagiri for this year

पावस (रत्नागिरी) : यावर्षी निसर्ग वादळ, सलग दोन वेळा समुद्राच्या पश्‍चिम-उत्तर क्षेत्रात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे यामुळे डिसेंबरअखेर रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर रिडले कासवे अंडी घालण्यासाठी आलेली नाहीत. मागील वर्षात मेपासून सुरवात झाली होती. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही किनाऱ्यावर गेल्या कित्येक महिन्यात अंड्यांची घरटी सापडली नाहीत. यावर्षी ऑलिव्ह रिडले विणीचा हंगाम लांबल्याने जिल्ह्याच्या अन्य कोणत्याही किनाऱ्यावर यंदा घरटी दुर्मिळ झाली आहेत.

रत्नागिरी तालुक्‍यातील निसर्ग संस्था वनविभागामार्फत तीन वर्षे ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ असलेल्या कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करून त्यांना समुद्रात सोडण्याचे काम करण्यात येते. त्यामुळे गावखडी समुद्रकिनारा कासव संवर्धनाचे प्रमुख क्षेत्र बनले आहे. येथील प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर व राकेश पाटील हे समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालून कासवांची तस्करी होऊ नये तसेच मासेमारी जाळीमध्ये अडकून धोका निर्माण होऊ नये यावर सदैव लक्ष ठेवून असतात. परिसरातील लोकांना व मच्छीमारांना या संदर्भात माहिती असल्याकारणाने कोणीही चुकीचे काम करत नसल्याचे दिसून येत आहे. समुद्रातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे गेले कित्येक महिने समुद्रकिनारी अंडी सापडली नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यप्राण्याला लॉकडाउन केले होते. त्यामुळे त्यांचे फिरणे बंद झाले होते. त्यामुळेच ऑलिव्ह रिडले या कासव जातीवर समुद्राच्या नेहमीच्या होणाऱ्या बदलांचा त्यांच्या उत्पत्तीवर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 
या संदर्भात प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर वगळता रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही किनाऱ्यावर गेल्या कित्येक महिन्यांत अंड्यांची घरटी सापडली नाहीत. या संदर्भात आम्ही वारंवार गस्त घालून पाहणी करत असतो जेणेकरून घरटी दृष्टीस पडतील व त्यांचे संवर्धन करता येईल. त्यामुळे त्यांच्या विणीचा हंगाम लांबल्याचे दिसत आहे. 

"गेल्या वर्षात मेपर्यंत चौदा घरट्यांच्या माध्यमातून सुमारे ८०० ते ९०० अंडी प्राप्त झाली होती. त्यांना समुद्रात सोडून मार्गस्थ करण्यात आले होते. अंडी नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान किनाऱ्यावर प्राप्त होतात. परंतु, दोन वेळा समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उलट्या बाजूने घरटी सापडल्याचे दिसून येत आहे. कारण सिंधुदुर्गऐवजी हरिहरेश्वर रायगड वरून सुरवात झाली."

- प्रदीप डिंगणकर, घरटी संवर्धक

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com