ओडिशाच्या किनाऱ्यावर अंडी घालणारी मादी कासव महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येऊनही अंडी घालतात, ही माहिती पुढे आली आहे.
रत्नागिरी : ओडिशाच्या किनाऱ्यावर फ्लिपर टॅग केलेले ‘ऑलिव्ह रिडले’ (Olive Ridley Turtle) समुद्री कासव रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आल्याची नोंद वनविभागाच्या (Forest Department) कांदळवन कक्षाकडे झाली आहे. त्या कासवाला लावलेल्या ‘फ्लिपर टॅग’मुळे ही माहिती पुढे आली. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अंडी घालणारे मादी कासव देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आल्याची ही पहिलीच नोंद आहे.