चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडची दुसरी बाजू खड्ड्यात

बहादूरशेख नाका ते गणपती मंदिर रस्ता; ठेकेदाराचे दुर्लक्ष, वाहनचालकांना त्रास
chiplun
chiplunsakal
Updated on: 

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलापासून राष्ट्रीय महामार्गावरील(MUMBAI- GOA HIGHWAY) गणपती मंदिरदरम्यान उड्डाणपुलाच्या कामास गेल्या वर्षापासून सुरुवात झाली आहे. मात्र, या उड्डाणपुलाच्या कामामुळे तयार केलेले सर्व्हिस रोड पुरते खड्ड्यात गेले होते. यावरून व्यापारी व नागरिकांनी आवाज उठवल्यावर १५ दिवसांनी ठेकेदाराने एका बाजूचे सर्व्हिस रोडचे(service road) डांबरीकरण केले. मात्र, त्यावर चार दिवस झाले तरी दुसऱ्या बाजूस असलेल्या मार्गाचे डांबरीकरण झालेले नाही. परिणामी, तेथून वाहनचालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.

chiplun
आरजीपीपीएल बंद पडल्यास बेरोजगारी !

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत गेले तीन वर्षे शहरात काम सुरू आहे. सुरवातीला मुख्य रस्ते खड्ड्यात गेल्याने नागरिकांनी खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले होते. नागरिकांचा रोष वाढल्यावर हे खड्डे भरण्यात आले. त्यानंतर गणपती मंदिर ते वाशिष्ठी पुलापर्यंतचा सर्व्हिस रोड खड्ड्यात गेला होता. गेल्या महिन्यात एक नवी कोरी चारचाकी बस या रस्त्यावरील लहान खड्डा वाचवताना मोठ्या खड्ड्यात गेली होती. नियमितपणे नागरिकांना या रस्त्यावरील खडड्यातून प्रवास करावा लागत असल्याने त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच प्रशासनाला निवेदन देत डांबरीकरणाची मागणी केली होती.

chiplun
Raigad Special | पेरूच्या फांदीमुळे भावकीत लागतायेत भांडणे ! पाहा व्हिडीओ

खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक, वाहनचालक, शहरातील मार्कंडी ते बहादूरशेख नाकादरम्यान मार्गावरून प्रवास करण्यास प्राधान्य देत होते. अवजड वाहतूक मात्र खड्ड्यातूनच महामार्गावरून सुरू होती. अखेर ठेकेदार इगल कंपनीने ३ जानेवारीला सर्व्हिस रोडच्या डांबरीकरण कामास सुरवात केली. एका बाजूचा रस्ता डांबरीकरण झाल्याने वाहतूक सुलभ झाली. डांबरीकरणाचे काम दर्जेदार होण्यासाठी ठेकेदार कंपनीचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस रोडचेही तत्काळ डांबरीकरण करणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. मात्र चार दिवस झाले तरी दुसऱ्या बाजूस डांबरीकरणाला सुरवात झालेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com