हॅलो मी मॅनेजर बोलतोय म्हणत केला फेक काॅल अन् बसला तरुणाला ​ 23 लाखांचा ऑनलाईन गंडा ....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

वीस लाखांचे वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रयत्नात 23 लाख रुपये गमावण्याची वेळ  आली...

देवरूख (रत्नागिरी) : वीस लाखांचे वैयक्तिक कर्ज घेण्याच्या प्रयत्नात 23 लाख रुपये गमावण्याची वेळ संगमेश्वर तालुक्‍यातील एका तरुणावर आली. या ऑनलाईन फसवणुकीबाबतची तक्रार संगमेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. साखळकोंड येथील विजय रामचंद्र पंडित यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 

विजय पंडित यांच्या मोबाईलवर फ्युचर केअर कंपनीच्या इंदूर शाखेतून मॅनेजर बोलत आहे, असा हिंदी भाषिकाचा फोन आला. तुम्हाला फ्युचर केअर कंपनीतून वीस लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्याने पंडित यांचा विश्वास संपादन केला आणि कर्जासाठी लागणाऱ्या प्रक्रियेसाठी आयडीबीआय बॅंकेची दिल्लीतील शाखा (सिव्हिल लाइन), वैश्‍य बॅंकेची पश्‍चिम बिहार शाखा या वेगवेगळ्या बॅंकांच्या शाखेत जीएसटी, इन्कम टॅक्‍स इत्यादींसाठी पैसे भरायला सांगण्यात आले.

हेही वाचा- शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश ;  या शिक्षकांना मिळणार वर्क फ्रॉम होमच.... -

वैयक्तिक कर्ज मिळणे दूर; साखळकोंडातील तरुण ​

पंडित यांनी जनता बॅंक व बॅंक ऑफ इंडियाच्या संगमेश्वर शाखांमधून अलोक शर्मा, रविसिंग या व्यक्तींच्या खात्यात 23 लाख 29 हजार 883 रुपये भरले. एवढे करूनही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पंडित यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one fraud call and online 23 lakh in an attempt to take a personal loan of Rs 20 lakh